जवळा (खुर्द) – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकरावजी मोहेकर तसेच माजी प्राचार्य डॉ.सूर्यकांत जगदाळे यांनी छत्रपती संभाजी विद्यालय, जवळा (खुर्द),ता.कळंब येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यालयातील शैक्षणिक वातावरण,उपक्रम व विद्यार्थी प्रगती यांचा त्यांनी आढावा घेतला.विद्यालयाच्या वतीने डॉ.मोहेकर व डॉ.जगदाळे यांचा यथोचित सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक शिक्षक अशोक सावंत,सूर्यकांत लोहार, श्रीकांत तांबारे,धनंजय डोळस, पृथ्वीराज लोमटे,उस्मान शेख व ओम डिकले यांची उपस्थिती लाभली. या सदिच्छा भेटीने विद्यालयातील शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांमध्ये नवीन प्रेरणा निर्माण झाली असून, संस्थेच्या नेतृत्वाचे मार्गदर्शन लाभल्याने शैक्षणिक कार्यास अधिक गती मिळेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
More Stories
छत्रपती संभाजी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
छत्रपती संभाजी विद्यालयात शिष्यवृत्ती धारक विद्यार्थांचा सत्कार
छत्रपती संभाजी विद्यालयाचे घवघवीत यश