June 20, 2025

छत्रपती संभाजी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील जवळा खुर्द येथील छत्रपती संभाजी विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
    चांदणे वैष्णवी 92.80%,पवार श्रावणी 92.60% ,पवार विशाखा 92.20% गुण घेऊन विद्यालयातून प्रथम द्वितीय व तृतीय आली आहे.पवार सिद्धी 91.40%,रणखांब वेदांती 91.00% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
    विद्यालयातून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले 17 विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीत 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर द्वितीय श्रेणीत 3 विद्यार्थी, तृतीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर, संस्थेचे जेष्ठ संचालक तथा शालेय समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब पाटील,संस्थेचे जेष्ठ संचालक भगवानराव लोमटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत पवार,माता पालक संघाचे अध्यक्ष ज्योती जाधव,शाळेचे मुख्याध्यापक संभाजी गिड्डे,धनंजय डोळस, सूर्यकांत लोहार,अशोक सावंत, श्रीकांत तांबारे,पृथ्वीराज लोमटे, उस्मान शेख,ओमकार डिकले यांनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!