June 19, 2025

छत्रपती संभाजी विद्यालयात शिष्यवृत्ती धारक विद्यार्थांचा सत्कार

  • जवळा (खू) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील जवळा खुर्द येथील छत्रपती संभाजी विद्यालयात राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती धारक व सारथी शिष्यवृत्ती धारक,एन एम एम एस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष तथा ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे संचालक तात्यासाहेब पाटील होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष श्रीकांत पवार,कमलाकर शेवाळे,माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी पवार उपस्थित होते.
    या वेळी एन एम एम एस धारक भावना पवार,श्रावणी शिंदे , सारथी शिष्यवृत्ती धारक भक्ती लोमटे,राधा ढाणे व पात्र विद्यार्थी आफ्रिन सय्यद,स्नेहल शिंदे, तेजस्वीनी जाधव ,जोया मुलाणी,तनुजा सिरसाट,प्रगती गुळवे या सर्वांचा प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत पवार यांच्या कडून शाळेतील मुख्याधापक संभाजी गिड्डे व मार्गदर्शक शिक्षक धनंजय डोळस,सूर्यकांत लोहार,अशोक सावंत,श्रीकांत तांबारे,शिक्षकेतर कर्मचारी पृथ्वीराज लोमटे,उस्मान शेख व ओम डिकले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विशाल संगवे यांचा सत्कार करण्यात आला .
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी गिड्डे यांनी केले. तर सूत्रसंचालन अशोक सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन सूर्यकांत लोहार यांनी केले.कार्यक्रमास लक्ष्मण लोमटे,माता पालक संघाच्या अध्यक्षा सौ.रोहिणी जाधव , आबासाहेब गुळवे,जाकीर मुलाणी,भरत लोंढे,बालाजी पवार व विद्यार्थी – विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!