उदगीर – उदगीर शहरात साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चित्रकला स्पर्धेचे आयाजोन महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजयजी बनसोडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर शहराध्यक्ष सय्यद जानी भाई यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बन्सीलालदादा कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष अमोल अणकल्ले,अजित दादा कांबळे, आदी उपस्थित होते.उदगीर शहरातील १५ शाळेतील ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मुख्य सयोजक जवाहरलाल कांबळे,कार्याध्यक्ष रविंद्र बेद्रे, सचिव अरविंद शिंदे,प्रसिद्धी प्रमुख प्रदीप जोंधळे,कोषाध्यक्ष संतोष बडगे,देवेंन टाकळकर, कलाशिक्षक अरविंद सूर्यवंशी, संजय महापुरे आदीनी परिश्रम घेतले .
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो