May 14, 2026

छत्रपती संभाजी विद्यालयात महाराष्ट्र मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा

  • जवळा (खुर्द) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजी विद्यालय,जवळा (खुर्द) ता.कळंब येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र मुक्तिसंग्राम दिन उत्साहात संपन्न झाला.
    कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत पवार, शालेय समितीचे इतर मान्यवर सदस्य,तसेच ज्येष्ठ शिक्षक धनंजय डोळस,सूर्यकांत लोहार,अशोक सावंत,श्रीकांत तांबारे,पृथ्वीराज लोमटे,उस्मानभाई शेख व ओम डिकले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
error: Content is protected !!