August 8, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर जयंतीनिमित्त शाळेला साउंड सिस्टम भेट

  • अविनाश शिंदे यांचा अभिनंदनीय उपक्रम
  • मातोळा — शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोक मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मातोळा येथे
    दि.२७ जुलै २०२५ रोजी एका प्रेरणादायी उपक्रमाच्या साक्षीने मातोळा येथील शाळा सन्मानित झाली.
    या विद्यालयातील सहशिक्षक अविनाश प्रकाशराव शिंदे यांनी आपल्या मातोश्री कै.इंदुमती प्रकाशराव शिंदे (माजी मुख्याध्यापिका) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेला साउंड सिस्टिम भेट देत समाजात एक सकारात्मक आदर्श ठेवला.
    कार्यक्रमप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष डी.टी.(नाना) भोसले, संस्थेचे संचालक संजय भोसले, गावचे प्रथम नागरिक गोविंद भोसले,अमरसिंह भोसले,मधुकर भोसले,राम माळी,गोविंद भोसले, तसेच मुख्याध्यापक अजित साळवे, पर्यवेक्षक डबे गंगाधर, ज्येष्ठ शिक्षक विजयकुमार भोसले,व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    साउंड सिस्टमच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीरीत्या राबवता येणार आहेत.
    उपस्थित मान्यवरांनी अविनाश शिंदे यांच्या सामाजिक जाणीवेचे व मातेच्या स्मृतीप्रित्यर्थ केलेल्या योगदानाचे मन:पूर्वक कौतुक केले.
error: Content is protected !!