August 8, 2025

विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांची सहविचार सभा संपन्न

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य तथा मुख्याध्यापक अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माधवराव भोसले हायस्कूल, मातोळा येथे दि.१६ जुलै २०२५ रोजी विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांची सहविचार सभा म्हणजेच पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.
    या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शालेय पर्यवेक्षक श्री.डबे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक विजयकुमार भोसले,कुंभार सर, लहाने सर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शिंगारे सर यांच्या प्रस्तावनेने झाली.या कार्यक्रमात पालकांनी शाळेबाबत आपली मते स्पष्टपणे मांडली.त्यांनी शाळेच्या गुणवत्ता उन्नयनासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत अनेक सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी चर्चा करताना काही महत्त्वाच्या सूचना पालकांनी मांडल्या.उपस्थित शिक्षकांनी त्या सूचना गांभीर्याने ऐकून त्यावर तात्काळ निराकरणाचे आश्वासन दिले.
    कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन शिंदे अविनाश यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत भोसले, तुकाराम मोरे, अरविंद पवार आणि इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
    या सहविचार सभेमुळे शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील संवाद अधिक बळकट होऊन शैक्षणिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
error: Content is protected !!