August 8, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या जयंतीनिमित्त वही तुला

  • प्रा.रोहित मोहेकर यांचा स्तुत्य उपक्रम..!
  • कळंब – “शिक्षक हा केवळ ज्ञानदाते नसून समाज घडवणारा असतो,”याचे जिवंत उदाहरण मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. रोहित मोहेकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
    शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत संस्थेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सव्वाशे डझन वह्यांचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला.
    या कार्यक्रमात गुरुजींचे तिन्ही सुपुत्र – संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर आणि माजी सरपंच रमेश मोहेकर यांचा ‘वही तुला’ करण्यात आला.यामध्ये एकत्रित सव्वाशे डझन वह्या संकलित करण्यात आल्या असून,त्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वितरित केल्या जाणार आहेत.
    कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकूल,कोषाध्यक्ष प्रा.अंकुश पाटील,संचालिका अंजलीताई मोहेकर,गुरुजींच्या कन्या सौ.जाधव मॅडम,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा.संजय कांबळे,संचालक प्रा. वसंत मडके,डॉ.अभिजीत मोहेकर, निर्मलाताई मोहेकर तसेच संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    प्रा.रोहित मोहेकर यांचा हा उपक्रम सामाजिक भान जागृत करणारा ठरला असून,त्यांच्या कार्याची सर्वत्र स्तुती होत आहे.संस्थेच्या वैचारिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारे हे कार्य इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
error: Content is protected !!