August 8, 2025

मातोळा येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडे लावणीसाठी अभिनव उपक्रम

  • २०० विद्यार्थ्यांना देण्यात आली झाडांची भेट
  • मातोळा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली,औसा तालुक्यातील मातोळा येथील श्री माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
    या उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील २०० विद्यार्थ्यांना झाडे भेट देण्यात आली.ही झाडे विद्यार्थी स्वतः त्यांच्या घरातील जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते लावणार असून,त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.
    या उपक्रमामागचा उद्देश पर्यावरण संरक्षण,कौटुंबिक मूल्यांची जाणीव आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हा आहे.
    याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अजित साळवे,पर्यवेक्षक जी.टी.डबे, प्रा. अविनाश शिंदे, एस.एस. मुळे, वाजीद शेख, रोहकले व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!