आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१८ जुलै २०२५ रोजी विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे लोकशाहीर, साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यालयाचे सेवक बबन यादव यांच्या हस्ते डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यानंतर उपस्थित शिक्षक-शिक्षिकांनी डॉ.साठे यांच्या कार्याचा गौरव करत अभिवादनपर शब्द अर्पण केले. या प्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,सहशिक्षक नामदेव अंत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्येही या कार्यक्रमामुळे डॉ.साठे यांचे विचार पोहोचवले गेले.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
प्रा.रोहित मोहेकर यांच्या संकल्पनेतून विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप