August 8, 2025

मोहेकर महाविद्यालयात ‘करिअर कट्टा विद्यार्थी संवाद’ कार्यशाळा संपन्न

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात दि.१८ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र (MITSC) आणि शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा विद्यार्थी संवाद’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
    या कार्यशाळेचे आयोजन करिअर कट्टा कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या समन्वयाने करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत शितोळे (अध्यक्ष, MITSC) हे उपस्थित होते.त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मार्गदर्शनाच्या अभावामुळे ग्रामीण तरुणांचा होणारा संघर्ष मांडला. तसेच AI (Artificial Intelligence) चा करिअरमध्ये कसा उपयोग होऊ शकतो याची सखोल माहिती दिली.करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हेमंत भगवान होते. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करणे ही काळाची गरज असल्याचे मत मांडले.
    प्राचार्य डॉ.हरिदास फेरे (प्रवर्तक, करिअर कट्टा) यांनी सांगितले की, करिअर कट्टा उपक्रम हे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी संधीचं व्यासपीठ आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करिअर घडवण्यासाठीच व्हावा, असा आग्रह त्यांनी व्यक्त केला.
    जिल्हा समन्वयक डॉ.नितीन पडवळ यांनी करिअर कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा, सायबर सेक्युरिटी, ई-फायलिंग, युपीएससी, एमपीएससी याबाबत वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
    या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा सरवदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अर्चना मुखेडकर (समन्वयक,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष) यांनी केले.
    कार्यक्रमाचे आयोजन डॉ.ईश्वर राठोड व डॉ.विश्वजीत म्हस्के (तालुका समन्वयक) यांनी केले.
    याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आप्पासाहेब मिटकरी,डॉ.चिंते,डॉ.चांदोरे, डॉ.गुंडरे, डॉ.सूर्यवंशी,डॉ.पावडे, डॉ.आदाटे,डॉ.सावंत,डॉ.महाजन, साक्षी पावनज्योत उपसंपादक अरविंद शिंदे,प्रा.शाहरुख शेख, प्रा.ऋतुजा मिटकरी हे मान्यवर उपस्थित होते.
    कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी हनुमंत जाधव,अर्जुन वाघमारे, इकबाल शेख,साजिद शेख,जया पांचाळ यांनी विशेष मेहनत घेतली.
    या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!