पिंपळगाव (लिंगी) – ग्रामीण भागातील शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि शिक्षणतज्ञ डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली,निर्भीड आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या लेखणीतून साकारलेला सा.साक्षी पावनज्योतचा कै.सुमन आई मोहेकर प्रथम स्मृतिदिन विशेषांक तसेच शिक्षण तज्ञ डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांक दिनांक ४ जुलै २०२५ रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित संभाजी विद्यालय पिंपळगाव (लिंगी),ता.वाशी येथे प्रकाशित करण्यात आला. या विशेषांक प्रकाशन प्रसंगी सहाय्यक शिक्षक सुनील बावकर, संतोष ढोले,संतोष बोडके, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुहास जगताप,शिवराम शिंदे,लहू फुरडे व कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी कै.सुमन आई मोहेकर यांच्या त्यागमय जीवनकार्याचा सा.साक्षी पावनज्योत विशेषांकात लेखाद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे.तसेच डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातील योगदानाचा समावेश आहे.
More Stories
संभाजी विद्यालयात लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
संभाजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संभाजी विद्यालयात अभिवादन