February 8, 2026

संभाजी विद्यालयात जिजाऊ–विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

  • वाशी — ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव लिंगी येथील संभाजी विद्यालयात दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना जिजाऊ व विवेकानंद हे केवळ भारताचेच नव्हे तर समस्त जगाचे मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन केले. घराघरात जिजाऊंच्या प्रतिमेसोबत त्यांच्या विचारांची अंमलबजावणी व्हावी, तसेच युवकांमध्ये स्वामी विवेकानंदांचे विचार अधिक प्रभावीपणे रुजविण्यासाठी पालक व शिक्षकांनी संयुक्त प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख सुहास जगताप यांनी केले, तर समारोप संतोष बोडके यांनी केला.
    या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, तसेच संतोष ढोले, संतोष बोडके, सुहास जगताप हे शिक्षक व शिवराम शिंदे, लहु फुरडे हे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    या जयंती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व समाजोपयोगी मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली.
error: Content is protected !!