February 7, 2026

विद्यार्थ्यांची तहान भागवली! शिवम बोअरवेल कन्हेरवाडीची निस्वार्थ सेवा; बंद बोअरवेल मोफत दुरुस्त

  • वाशी – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी विद्यालय, पिंपळगाव लिंगी येथे विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य घडून आले.
    दिनांक २८ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी शिवम बोअरवेल, कन्हेरवाडी यांच्या समूहाने शाळेतील गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेल्या बोअरवेलची एच.डी.कॅमेराद्वारे तपासणी करून कोणताही अवाजवी मोबदला न घेता निस्वार्थ भावनेने बोअरवेल दुरुस्त केला. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला असून विद्यार्थ्यांची तहान भागवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले.
    या कार्यासाठी स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष पंडितराव कोल्हे यांनी श्यामसुंदर कवडे यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या हितासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देत शिवम बोअरवेल समूहाने तात्काळ सर्व यंत्रणा कार्यान्वित करून बोअरवेल स्वच्छ करून दुरुस्त केला.
    या कामात शिवम बोअरवेलच्या नेतृत्वाखालील रामराजे धोंगडे, आनंद कवडे,श्रीकांत कवडे, बालाजी जगताप आदी सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. बोअरवेल सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून आला.
    शिवम बोअरवेल हे गेल्या २० वर्षांपासून अखंड सेवा देत असून १०० टक्के खात्रीने काम करतात. काम पूर्ण झाले नाही तर मोबदला न घेणे, तसेच अडचणीत असलेल्या शेतकरी व कष्टकरी बांधवांना माणुसकीच्या भावनेतून मदत करणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
    या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्यासह शिक्षक सुनील बावकर, संतोष ढोले, संतोष बोडके, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शिवराम शिंदे,लहू फुरडे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!