पारा – ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रसारासाठी आयुष्य वाहिलेल्या शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कार्यरत असलेल्या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाच्या पुढाकारातून आणि शिक्षणतज्ञ डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या अभ्यासपूर्ण लेखणीतून साकारलेला सा.साक्षी पावनज्योतचा ‘कै.सुमन आई मोहेकर प्रथम स्मृतिदिन विशेषांक’ आणि ‘डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांक’ यांचे प्रकाशन दि.४ जुलै २०२५ रोजी जय भवानी विद्यालय,पारा ता.वाशी येथे पार पडले. या प्रसंगी कार्यकारी संपादक प्रा. अविनाश घोडके यांनी उपस्थितांना संबोधित करताना शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘साक्षी पावनज्योत’ हे साप्ताहिक कसे प्रभावी माध्यम बनले आहे,याची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास वरिष्ठ शिक्षक भराटे संदीप,श्रीमती शितल मेटे, सतीश वाघमारे,दीपक मुरकुटे, विकास माळी,अमोल बांगर, दीपक मुळे,शहाजी सोलंकर, अमोल गवळी,तुषार डंबरे यांच्यासह अनेक मान्यवर व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेषांक प्रकाशनामुळे सुमन आईंच्या स्मृतीला उजाळा मिळाला असून,डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
More Stories
जय भवानी विद्यालय,पारा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
जय भवानी विद्यालय पारा येथे डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
जय भवानी विद्यालय पारा येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप उपक्रम