कळंब – कळंब तालुक्यातील एकूण ९२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०२५ ते २०३० या कालावधीतील सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहे.यासाठीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीचे बैठक हॉल,कळंब येथे दि.१० जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या आरक्षण सोडत कार्यक्रमात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,इतर मागासवर्गीय,विशेष मागासवर्गीय व महिला अशा विविध प्रवर्गांकरिता सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे.हा कार्यक्रम पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी यामध्ये उपस्थित राहून माहिती मिळवावी,असे आवाहन कळंब तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले आहे. आरक्षण सोडतीदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी शिस्त व नियमांचे पालन करून कार्यक्रमाला सहकार्य करावे,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले