September 20, 2026

संभाजी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन

  • वाशी – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी विद्यालय,पिंपळगाव लिंगी (ता. वाशी) येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रम संपन्न झाला.
    दि.२९ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी आयोजित या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक सुनील बावकर,संतोष ढोले,संतोष बोडके, सुहास जगताप तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शिवराम शिंदे, फुरडे एल. आर. आदी उपस्थित होते.
    या पूजन कार्यक्रमातून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या शैक्षणिक कार्यास व समाजासाठी केलेल्या योगदानास आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले.
error: Content is protected !!