कन्हेरवाडी – दि.३ जुलै २०२५ रोजी विद्याविकास हायस्कूल, कन्हेरवाडी (ता.कळंब) येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होत असलेल्या “सा.साक्षी पावनज्योत” या साप्ताहीकाच्या डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन शाळेचे मुख्याध्यापक सुनील पांचाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमात कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गुरुजींच्या विचारांची आणि कार्याची उजळणी करणारे हे साप्ताहिक त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला सक्रीय सहकार्य करावे.” या कार्यक्रमाला सहाय्यक शिक्षक संजयकुमार माळी,मनोज कुमरे, संतोष मोरे,अमरसिंह पाटील, अशोक कोळपे,सतीश पवार तसेच श्रीमती मंजुश्री टेकाळे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शालेय परिवाराने परिश्रम घेतले.
More Stories
विद्या विकास हायस्कूलमध्ये शास्त्रज्ञ डॉ.बालाजी आगलावे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
कन्हेरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
शिवव्याख्याते सुजित नामदेव तांबे यांच्यातर्फे पुस्तके भेट