कन्हेरवाडी – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोक मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक सुनिल पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे येरमाळा गावचे सुपुत्र व अमेरिकेतील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. बालाजी आगलावे यांनी दिनांक ७ जुलै २०२५ रोजी शाळेला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. आगलावे यांनी अमेरिकन व भारतीय शेती पद्धतीतील फरक समजावून सांगितला.त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाधिष्ठित व सुधारित शेतीपद्धती अवलंबण्याचे महत्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात कार्य करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा व “मी क्लासवन मार्क घेईनच” असा आत्मविश्वास मनात बाळगावा,असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून मेहनतीने यशाची शिखरे पादाक्रांत करावीत,असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक शिक्षक संजयकुमार माळी यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक अमरसिंह पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुनिल पांचाळ,सहाय्यक शिक्षक मनोज कुमरे,संतोष मोरे,अशोक कोळपे,सतीश पवार तसेच श्रीमती मंजुश्री टेकाळे यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक,विद्यार्थी व उपस्थित होते.
More Stories
गणित दिनानिमित्त विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे विद्यार्थ्यांची गणितीय बुद्धिमत्ता स्पर्धेतून उजागर
विद्याविकास हायस्कूल,कन्हेरवाडी येथे “सा.साक्षी पावनज्योत”वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन
कन्हेरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा