August 8, 2025

ज्ञानोद्योग विद्यालयाचे नूतन प्राचार्य सुनील पाटील यांचा सत्कार व “सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे प्रकाशन

  • येरमाळा – ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नूतन प्राचार्य तथा मुख्याध्यापक सुनील पाटील यांचा “सा.साक्षी पावनज्योत” परिवाराच्या वतीने दि. ३ जुलै २०२५ रोजी गुरुवारी कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांच्या हस्ते सप्रेम भेट घेऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेल्या साप्ताहिकाच्या डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन घेण्यात आले.
    कार्यक्रमात विशेषांकाचे प्रकाशन प्राचार्य सुनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
    तसेच या प्रसंगी कै.सुमनआई मोहेकर प्रथम स्मृती दिन विशेषांकाचेही वितरण करण्यात आले.कार्यक्रमाची साहित्यिक व सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाची नोंद झाली.

  • कार्यक्रमास सहाय्यक शिक्षक दिलीप मोरे,सयाजी बारकुल, विनोद बारकुल, सुहास बारकुल, अनिल साहू, गट्टुवार, देवकर, जळकोटकर,सतीश वाघमारे, सहाय्यक शिक्षिका सीना सिरसाट यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!