नागपुर – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर (माफसु) च्या विस्तार शिक्षण विभागात कार्यरत स्विय सहायक प्रवीण बागडे यांना 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान केंद्र सरकारच्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान 2025’ चा विद्यापीठाचा अहवाल तयार करणेकरीता सक्रिय सहभागासाठी डॉ.अनिल भिकाने, संचालक,विस्तार शिक्षण यांच्या निरोप संमारंभ प्रसंगी पुष्पगुच्छ आणि सम्मानपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.यापूर्वी सुध्दा त्यांच्या उल्लेखनीय कार्य, उत्साह आणि निष्ठेसाठी ‘उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार’ आणि ‘उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार’ प्रदान करुन गौरविण्यात आले. त्यांच्या लागोपाठ यशस्वी प्रयत्नांचे फार कौतुक केले जाते. देशभर ‘विकसित कृषी संकल्प अभियान’हा राष्ट्रीय अभियान सुरु करण्यात आला होता,जो भारतीय कृषीला वैज्ञानिक पद्धती,शाश्वत पद्धती आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून अद्यावत करण्यासाठी झोकून दिले.ज्याचे मार्गदर्शन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री,शिवराज सिंह चौहान आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (भाकृअप) यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडले. याप्रसंगी विस्तार विभागाचे तांत्रिक अधिकारी डॉ.गीतांजली ढुमे,डॉ.सारीपुत लांडगे,मोहन कापसे,गौरी भदोरिया यांना सुध्दा त्यांच्या समर्पित कार्याबद्दल आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ आणि सम्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
More Stories
विद्यार्थ्यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अंगीकार करत ध्येय गाठावे – सरन्यायाधिश न्यायमूर्ती भूषण गवई
लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठेंनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर – अण्णाभाऊ साठे