June 22, 2025

कन्हेरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

  • कन्हेरवाडी- दिनांक 21 जून 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरवाडी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांचा प्राणायाम व योगासने घेण्यात आली.शाळेतील सहशिक्षक दीपक चाळक सर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.व आपण दररोज व्यायाम व प्राणायाम का करावा ते सांगितले.शाळेचे मुख्याध्यापक भंडारे बी.एन.यांनी विद्यार्थ्यांना दररोजच्या आहाराप्रमाणेच सध्याच्या काळात आपणाला निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज असल्याचे सांगितले.विविध प्रकारची योगासने व प्राणायाम यांची माहिती देत.प्रत्यक्ष कृती करत विद्यार्थ्याकडून प्राणायाम व योगासने करून घेतली.शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यामध्ये आनंदाने सहभागी झाले होते.
error: Content is protected !!