August 8, 2025

बीड येथे आडसूळ-काळे परिवाराचा विवाह सोहळा तंतोतंत वेळेत संपन्न

  • विवाह सोहळ्याच्या प्रवासातच कवी संमेलन

  • कळंब – येथील ह.भ.प महादेव महाराज आडसूळ यांचे चिरंजीव महाविष्णू यांचा विवाह दिनांक ८ जून २०२५ रोजी धैर्यशील काळे यांची कन्या देविका यांच्याशी बीड येथील सिंहगड लॉन्स मध्ये लग्न पत्रिकेत दिलेले वेळ दुपारी १२.३५ वाजता अगदी तंतोतंत वेळेत संपन्न झाला.हल्ली डिजिटल जमान्यात लग्न कार्य म्हटलं की,नवरदेवाची निघत असलेली डिजेच्या तालावरील मिरवणूक,बेधुंद होऊन नाचणाऱ्या नवरदेवांच्या मित्रामुळे लग्न वेळेवर लागत नाहीत.परंतु वेळेचे भान ठेवून नवरदेव महाविष्णू यांनी वेळेच्या अगोदर ५ मिनिटे बहुल्यावर चढून दाखवत शिस्त आणि वेळेचे महत्व सिद्ध करून दाखवल्यामुळे वऱ्हाडी मंडळाकडून समाधान व्यक्त झाले.ह.भ.प महादेव महाराजांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यामुळे सर्वच क्षेत्रातील आणि सर्व जाती धर्मातील मंडळींनी या विवाह सोहळ्यास हजेरी लावून वधू-वरास शुभेच्छा दिल्या.हे विशेष आकर्षण ठरले.तर कळंबहून या विवाहासाठी जाणाऱ्या २६ गाड्या पैकी MH-२५ BA ४३१५ या क्रमांकाच्या क्रूझर गाडी मध्येच अँड.मनोज चोंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रात कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या रंगतदार मैफिलीत सोपान पवार,महादेव गपाट,माधवसिंग राजपूत,सुभाष घोडके,प्रकाश भडंगे, जगदीश जाजू,सुरेश कवडे यांनी आपल्या रस भरीत अशा स्वरचित वैचारिक आणि क्रांतिकारी रचना सादर करून मनोरंजन केले तर ह.भ.प माळी महाराज पानगावकर यांनी गवळणी सादर करून अधिक रंगत आणली. यासाठी भाजपाचे सतपाल बनसोडे,रिपब्लिकन सेनेचे अनिल हजारे,ह.भ.प नलावडे महाराज,प्रशांत पडवळ,अण्णा शेळके,सुदर्शन कोळपे,अनंत घोगरे यांनी भरभरून अशी दाद दिली.दोन्ही सत्राचे बहारदार सूत्रसंचालन बंडू ताटे यांनी केले.

error: Content is protected !!