धाराशिव – मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक दिनांक ६ जून २०२५ रोजी सागर जाधव यांच्या निवासस्थानी प्रा.अर्जुन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील यांच्या सूचनेवरून केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रा.अर्जुन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत केंद्रीय कार्यकारणीवर प्रा.अर्जुन जाधव यांची फेरनिवड करण्यात येऊन धनंजय उद्धवराव पाटील यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीवर जिल्हाध्यक्ष- सुरेश शेळके, उपाध्यक्ष-पत्रकार महेश पोतदार, सचिव- विजय गायकवाड, कोषाध्यक्ष – सागर जाधव,सदस्य- धनंजय पाटील,धर्मवीर कदम,नवनाथ पवार,सुभाष चव्हाण, श्रीहरी लोखंडे,दिपक बारकुल, प्रा.धनंजय मुंडे,युनूस पटेल, अमोल घोगरे,शामराव लावंड, ॲड.चैतन्य वीर तर धाराशिव तालुकाध्यक्ष शामराव लावंड,कळंब तालुकाध्यक्ष दीपक बारकुल,तुळजापूर तालुकाध्यक्ष प्रा.धनंजय लोंढे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली. परिषदेचे जिल्हा कार्यालय अंजली निवास,भाई उद्धवराव पाटील पतसंस्थेसमोर,छत्रपती हायस्कूल जवळ धाराशिव येथे निश्चित करण्यात आले असून लवकरच बोर्ड लावण्यात येणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश शेळके यांनी कळविले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला