कळंब – येथील बस स्थानकात कळंब शहरातील प्रतिष्ठित व्यापारी स्वर्गीय कैलासजी अग्रवाल यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून स्वखर्चाने उभारलेल्या अत्याधुनिक पाणपोईचा लोकार्पण सोहळा कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते दि.८ जून रविवार रोजी करण्यात आला . कळंब बस स्थानकात स्वखर्चातून उभा करण्यात आलेल्या अत्याधुनिक पाणपोईची व्यवस्था अग्रवाल परिवाराकडून करण्यात आली होती.या पाणपोईचा खर्च जवळपास सहा लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रवाशांच्या आरोग्यवर्धक स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून पाणपोई चा माध्यमातून लोकार्पण सोहळा नुकताच आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला . याप्रसंगी अग्रवाल परिवारातर्फे श्रीमती रेखाताई अग्रवाल ,कल्पेश अग्रवाल ,कार्तिक अग्रवाल ,कविता अग्रवाल ,योगेश अग्रवाल ,विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख ,या कार्यक्रमाचे अध्यक्ष कळंब चे आगार प्रमुख एस.डी.खताळ त्याचप्रमाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक,दिलीप पाटील ,मोहन जाधव ,प्रदीप मेटे ,प्रभाकर झांबरे, दत्ता मुंडे ,वाहतूक नियंत्रक हनुमंत मुंडे ,करसं पटेल, संजय देवडा, अमोल वाघचौरे ,शिवाजी निळे , विष्णू कोल्हे ,राजाभाऊ देशमाने,डॉ.श्याम चौधरी, ठेकेदार टेकाळे यांच्या सह आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्योतीराम तर व प्रभाकर झांबरे यांनी केले तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी कळंब बस स्थानकातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतले .** अग्रवाल परिवारातर्फे मागील पाच वर्षाच्या कोरोना काळात ऑक्सीजन कन्सिडर ऍडमिशन जी की बाजारामध्ये जवळपास तीन लाख रुपये किमतीची ही मशीन कळबंच्या नागरिकांसाठी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीला मोफत दिली होती.त्याचप्रमाणे आजची कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांनी पुन्हा आजच्या या कार्यक्रमात आणखी एक मशीन कळबं करांसाठी ऑक्सिजन कन्सिडर मशीन उपलब्धकरून दिली आहे.त्यांच्या या योगदानाबद्दल आमदार कैलास पाटील यांनी आभार मानले आहेत .
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन