August 9, 2025

चक्रवती सम्राट अशोक यांची जयंती वाघोली आश्रम शाळेत उत्साहात साजरी

  • वाघोली – येथील माध्यमिक आश्रम शाळेत चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2329 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    सुरुवातीला चक्रवती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चा,राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा यांच्या वतीने चलो गाव की और जाती जोडो समाज जोडो परिवर्तन यात्रा निमित्त अभियाना अंतर्गत आरएसएस प्रणित भाजप सरकारकडून ईव्हीएम मशीन चा वापर करून अमर्याद सत्तेवरती नियंत्रण मिळवले आहे.नागरिकांच्या मूलभूत हक्काचे हनन केले जात आहे.ओबीसीची जातीनिहाय जनगणना केली जात नाही व त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जात नाही तसेच बोधगया बुद्ध महाविहार या ठिकाणी ब्राह्मणांनी असविधानिक कब्जा मिळवलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आरएसएस बीजेपी कडून सतत महापुरुषांच्या बदनामीचे सत्र सुरू केलेले आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून मनुस्मृतीवर आधारलेला अभ्यासक्रम तयार करून येणाऱ्या पिढ्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आखण्यात आलेला आहे,महाराष्ट्र सरकारने जन सुरक्षा विधेयक च्या नावाखाली भारतीय राज्यघटनेच्या 19 व्या कलमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधन घालून हुकूमशाही पद्धतीने एक हाती सत्ता वापरून लोकांच्या हक्क अधिकारांचे उल्लंघन करण्याचे सत्र सुरू केलेलं आहे.या सर्व मुद्यांच्या विरोधात 9 एप्रिल 2025 ला संपूर्ण देशभरामध्ये जेलभरो आंदोलन देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक जुलै 2025 ला भारत बंद करण्यात येणार आहे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजातील सर्व अठरापगड जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन या हुकूमशाही सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रव्यापी जनआंदोलनाला साथ सहयोग द्यावा अशा प्रकारचं आवाहन केलेला आहे त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने प्रा. डी.व्ही.धावारे यांनी पूर्व हवेलीतील विविध गावांच्या मध्ये सम्राट अशोकाच्या जयंतीचे निमित्त साधून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम सुरू केलेलं आहे. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते शाळेच्या अधीक्षिका मंगला सोनवणे, गायकवाड सर,सुभाष नप्ते, लांडगे,गणेश तुले आदी मंडळी त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार प्रिया नप्ते,भारतीय युवा मोर्चाचे हर्षवर्धन कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि देशांमध्ये चाललेल्या अराजकता वरती लोकांच्या जागृती मधून राष्ट्रव्यापी आंदोलनातून मार्ग काढण्याचे आव्हान करण्यात आले.यावेळी आरुषी भोसले तिनेही आपले मनोगत केले व्यक्त केले त्याचबरोबर वैष्णवी तुले हिने उपस्थित त्यांचे आभार व्यक्त केले.
error: Content is protected !!