March 26, 2026

रॉक स्टार च्या विद्यार्थ्यांचे मंथन परीक्षेत घवघवीत यश!

  • गोविंदपूर (अविनाश सावंत) –
    कळंब तालुक्यातील गोविंदपूर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या वचनबद्धतेला कायम ठेवत रॉक स्टार (Rock star Classes) च्या विद्यार्थ्यांनी 2024-25 च्या मंथन परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे.या परीक्षेत इयत्ता 2 री,3 री,6 वी आणि 7 वी मधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उज्ज्वल निकालाची परंपरा पुढे नेली आहे.
    कु.तानगे आकांक्षा (228/300) इ.7 वी,कु.आवाड सोनाक्षी (178/300) इ.7वी,कु.घोगरे तनुष्का (174/300) इ. 6 वी,
    कु.हिंगे आरुषी (102/300)इ.3 री, माळी महेश (214/300) इ.7 वी,मुंडे अविष्कार (142/300) इ.7वी,मुंडे कुणाल (120/300)इ. 3री या विद्यार्थ्यांनी जून ते जानेवारी या कालावधीत कठोर परिश्रम घेतले,त्याचाच परिणाम म्हणून त्यांना अभूतपूर्व यश मिळाले. त्यांच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे कौतुक सर्वत्र होत आहे.विद्यार्थ्यांच्या यशामागे Rock star Classes चे शिक्षक श्री. सुरवसे बालाजी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आहे.
    या घवघवीत यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे,पालकांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन! Rock star Classes विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे उत्तुंग भरारी घेण्यासाठी सदैव प्रेरित करत राहील.
error: Content is protected !!