August 8, 2025

संभाजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  • वाशी- ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सर्व प्रथम राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले.त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रशालेतील सहशिक्षक जगताप एस.पी.यांच्याकडून तंबाखू मुक्ती शपथ देण्यात आली.भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो.हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे.या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती.ध्वजारोहणानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली तसेच प्रशालेमध्ये विविध सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
    या प्रसंगी स्थानिक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी,शालेय समितीचे अध्यक्ष श्रीमान पंडीतराव कोल्हे,स्थानिक शालेय समितीचे सर्व सदस्य दिलिपराव कुलकर्णी,शिवाजीराव सुकाळे, रमेश सुकाळे तसेच विद्याभवन हायस्कुल,कळंब येथील सेवानिवृत्त सेवक व मुळ पिंपळगाव लिंगी येथील रहिवाशी असलेले आश्रुबा खंडागळे व सर्व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक सुनिल बावकर,संतोष ढोले,संतोष बोडके,शिक्षकेत्तर शिवराम शिंदे ( पत्रकार दै.जनमत) व फुरडे एल.आर.आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!