धाराशिव- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर धाराशिव यांचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर खेड येथे सुरु आहे. शिबिराच्या सहाव्या दिवशी शिबिरार्थीनी कडून सकाळच्या सत्रामध्ये गावातील आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता करण्यात आली.दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यांनाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला डॉ.के. एम.क्षीरसागर,हिंदी विभाग, आर.पी.कॉलेज,धाराशिव हे प्रमुख वक्ते तर डॉ.एन.पी. पाटील,विभागप्रमुख,जल व भूमी व्यवस्थापन विभाग,विद्यापीठ उप-परिसर,धाराशिव, हे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते तसेच डॉ. आर.एम.तिगोटे,रसायनशास्त्र विभाग,विद्यापीठ उप-परिसर, धाराशिव व विद्याधर गुरव,कक्ष अधिकारी,विद्यापीठ उप-परिसर, धाराशिव यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रस्तुत प्रसंगी गुरव,डॉ. क्षीरसागर व डॉ.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.गुरव यांनी आपल्या संबोधनात असे मार्गदशन केले कि,आपण इतरां बद्दल वाईट भावना बाळगू नये. त्या गोष्टीचा परिणाम आपल्यावरच होऊ शकतो. मुख्य वक्ते डॉ.क्षीरसागर यांनी सायबर सिक्युरिटी व बँकिंग फसवणूक विषयी माहिती दिली. तसेच,कृत्रीम बुद्धिमत्तचे दुष्परिणाम व त्यामुळे तयार होणारे धोके सांगितले व ते कसे टाळावे हे स्पष्ट केले.आपण आपल्या अतिरेकी भावनावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे त्यांनी विषद केले. अध्यक्षीय संभोदनात डॉ.पाटिल म्हणाले कि,जीवन खूप सुंदर आहे.आपली विवेक बुद्धी वापरून ते समाधानकारक व अधिक समृद्ध बनविता येईल.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलशन सरवदे,पाहुण्यांचा परिचय नितीन शिंदे तर आभार यशवर्धन सूर्यवंशी यांनी केले. तसेच तिसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यां साठी सायबर सेक्युरिटी व बँकिंग फसवणूक या विषयावर सुरेश टकले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.त्यांनी या महत्वपूर्ण विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.बँकिंग फ्राॅड ची आकडेवारी विषद करून धोका किती मोठा आहे हे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले. सोसिअल अकाउंटस वापरतांनी आपली वैयक्तिक माहिती उघड होणार नाही,याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन त्यांनी केले.तसेच,आपल्याला एखादा ओटीपी आल्यास तो अनोळखी व्यक्तीला देऊ नये.अशी विविध माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. या सत्रामध्ये फ्राॅड कॉल,लॉटरी संदर्भातील एसएमएस,प्रलोभन देऊन एपिके अँपस, डिजिटल अरेस्ट,अकाउंट ब्लॉक संदर्भातील कॉल,स्क्रिन विव्हर या सारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.फसवणूक किंवा ब्लॅकमेलिंग चा प्रयत्न झाल्यास घाबरून न जाता,तज्ञ व्यक्ती किंवा पोलिसांसी संपर्क साधावा आदी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला