August 8, 2025

कै.सुमन आई मोहेकर प्रथम पुण्यस्मरण अंकाचे वाटप

  • कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योतचा कै.सुमनबाई (आई) मोहेकर प्रथम पुण्यस्मरण दिन विशेषांकाचे दि.२७ जानेवारी २०२५ रोजी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील
    विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांच्या हस्ते सप्रेम भेट देण्यात आला.
    या प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कै.सुमन आई मोहेकर यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात आला.त्यांच्या कर्तृत्वाने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचे शैक्षणिक विचारांचा प्रचार व प्रसार आणि माणुसकीची जोपासना यासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देण्यात आली व कै.सुमन आई मोहेकर यांच्या प्रेरणादायी जीवनाचे स्मरण करत त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यात आले.
    कै.सुमन आई मोहेकर यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा व गुरुजींचे शैक्षणिक विषयक विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास या कार्यक्रमातून प्रकट करण्यात आला.
    याप्रसंगी विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक व्यंकट कुंभार, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुभाष लाटे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!