August 8, 2025

इंजि.प्रकाश धस यांना बंधूशोक

  • कळंब – तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील शे.का.प.चे कट्टर कार्यकर्ते भाई तुकाराम धस वय ६४ वर्षे यांचे अल्पशा आजाराने दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १.३० वाजता अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,दोन भाऊ,दोन बहिणी आहेत.
    भाई तुकाराम धस यांनी शेकडो निराधारांना संजय गांधी,इंदिरा गांधी निराधार योजना मिळवून दिली असून कोणत्याही सुख दुःखाच्या कार्यक्रमात पुढाकार घेऊन स्वतःतन मन धनाने काम करत असल्याने ते लहान थोरांचे “नाना” होते.
    ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता पिंपळगाव (डोळा) येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव व परिसरातील त्यांचे शेकडो चाहते उपस्थित होते.
    सां.बा.वि.भागातील कार्यकारी अभियंता प्रकाश धस यांचे ते मोठे बंधू होत.
error: Content is protected !!