कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे सांस्कृतिक विभाग आणि रासेयोच्या संयुक्त विद्यमाने जगाला अहिंसा,सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणार्या परमपूज्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी,प्रा. दादाराव गुंडरे,रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.आर. व्ही. ताटीपामुल,प्रा.डॉ.संदीप महाजन,अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर,प्रा.नितीन अंकुशराव, प्रा.गोविंद काकडे,विनोद खरात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अधीक्षक हनुमंत जाधव,सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे,संगीता रूमने,रमेश भालेकर,साजिद शेख,कमलाकर बंडगर,अर्जुन वाघमारे,चांगदेव खंदारे,आदित्य मडके,उमेश साळुंखे यांनी परिश्रम घेतले.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले