August 9, 2025

हजारो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत डॉ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी महाबुद्ध वंदना

  • लातूर (संघपाल सोनकांबळे) – प्रज्ञासूर्य,उपेक्षितांचे नायक,महामानव,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त समस्त लातूरकरांच्यावतीने पु. भंतेजी पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सुखाणू समितीतर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    पूजनीय भिक्खु संघाच्यावतीने त्रिरत्न वंदना घेण्यात आली.या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली बौद्ध धम्माची आचारसंहिता म्हणजे बावीस प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन करण्यात आले.तसेच भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचण्यात आली.

  • या प्रसंगी पुढे बोलताना भिक्खु पय्यानंद थेरो म्हणाले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकार नव्हते,तर ते एका सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला, समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळवून दिला, आणि शिक्षण हे समाजाच्या उद्धाराचे साधन आहे हे शिकवले. बाबासाहेबांचे विचार आणि तत्वे आपण आपल्या जीवनात रुजवली, तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
    कार्यक्रमाचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने झाला.
    यावेळी भिक्खू पय्यानंद थेरो,भंते बुद्धशील,भंते बोधिराज,आर्या मेत्ता,या प्रसंगी समाज कल्याण सहायुक्त एस. एन चिकुर्ते,एम.एन.बलांडे,बापू गायकवाड,सुरेश गायकवाड,एम.एन.गायकवाड,केशव कांबळे,अनिल बनसोडे,भीमराव चौधंते,डॉ.सुधाकर गुळवे,पांडुरंग अंबुलगेकर,विठ्ठल जाधव,पृथ्वीराज शिरसाट,बसवंतप्पा उबाळे,डॉ.विजय अजनीकर,डॉ. अरुण कांबळे,चंद्रसेन भडके,प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ.संजय गवई, प्रा.देवदत्त सावंत,प्रा.विश्वनाथ आल्टे,संजय सोनकांबळे अँड.धम्मदीप बलांडे, राजूभाऊ सूर्यवंशी,डॉ.सदानंद कांबळे,बाबासाहेब गायकवाड,डी.एस.नरसिंगे,विनोद कोल्हे, विनय जाकते,उदय सोनवणे,अनिरुद्ध बनसोडे,ज्योतीराम लामतुरे, निलेश बनसोडे, प्रा.सतीश कांबळे,विशाल वाहुळे,रामराव गवळी,अशोक कांबळे,अंतेश्वर थोटे, पांडुरंग अंबुलगेकर,राहुल शाक्यमुनी,सरिता बनसोडे,सुशील चिकटे,शारदा लामतुरे, संगीता कांबळे ,सुजाता आजनिकर,शारदा घोबाळे,त्रिशाला घोडके तसेच महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणू समितीचे सर्व सदस्य व मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.

  • यावेळी सेवानिवृत्त महार बटालियन व शाक्यसंघ माता भीमाई सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्याद्वारे सलामी देण्यात आली. या
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी केले तर आभार मिलिंद धावारे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महा बुद्ध वंदना सुकानू समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!