August 8, 2025

तुळशीदास भीमराव शिंदे यांचे दुःखद निधन

  • बार्शी – तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी,वारकरी तुळशीदास भीमराव शिंदे (दादा) ,वय- ९८ वर्ष ,यांचे ठाणे येथे निवासस्थानी दि. ११-१०-२०२४ रोजी सकाळी पावणे पाच वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.
    मीरा-भाईंदर येथे कार्यरत असलेले अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय तुळशीदास (डी टी )शिंदे यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी सौ.कांताबाई,तीन मुले, तीन मुली,सुना,जावई व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर ममदापुर येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले,या अंत्यविधीला डी टी शिंदे यांचा मोठा मित्र परिवार,आप्तेष्ट उपस्थित होता.
    चिंचोली परिसरातील एक मोठं व्यक्तिमत्त्व आज हरपलं,अनेक कुटुंबातील लोकांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली.
error: Content is protected !!