August 8, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

  • धाराशिव (जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन भत्ता,निवास भत्ता व निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमधून उपलब्ध करुन देण्यात येतात.
    आयुक्त,समाज कल्याण,पुणे यांच्या ३१ जुलै २०२४ च्या परिपत्रकानुसार वसतिगृह प्रवेश व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२४-२५ साठी नवीन (New) व नुतनीकरण (Renewal/Existing) अर्ज पोर्टलवर ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज भरला नाही,अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरत असताना न्यु (New) टॅबवर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.ज्या विद्यार्थ्यांनी चालू अभ्यासक्रमासाठी मागील वर्षी स्वाधार योजनेचा लाभ घेतलेला आहे असे विद्यार्थी नुतनीकरणासाठी पात्र होतात.अशा विद्यार्थ्यांनी सन २०२४ – २५ करिता ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरत असताना न्यु (New) ऐवजी एक्झिस्टिंग (Existing) टॅबवर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
    तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२४-२५ करिता नवीन व नुतनीकरण अर्ज ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत भरावेत.विहीत मुदतीत अर्ज न भरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्याची राहील.असे समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!