धाराशिव (जिमाका) – इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडुन व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याकरिता http://mahadbtmahit.gov.in हे संकेतस्थळ २५ जुलै २०२४ पासून सुरू केले आहे. सन २०२४ – २५ करिता बहुतांश विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरले आहेत व ते अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अद्यापपर्यंत या अर्जांची पडताळणी करून सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजण कल्याण या कार्यालयाकडे सादर केले नाहीत. तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित प्राचार्यांनी सन २०२४ – २५ करिता आपल्या महाविद्यालयाच्या लॉगिन वर प्रलंबित असलेले व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्तीचे पात्र अर्ज मंजुरीसाठी तात्काळ सादर करण्यात यावे.अर्ज सादर करत असताना शाळा सोडलेला दाखला (T.C) व गुणपत्रक हे मुळ प्रत (ORIGINAL) च असावेत.ज्या अर्जामध्ये त्रुटी असतील असे अर्ज त्रुटीपुर्तता करुनच या कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करावेत. महाविद्यालयाच्या लॉगिनला एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही.याची दक्षता घ्यावी.तसेच ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती अर्ज भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता महाविद्यालय स्तरावरून सूचित करावे.असे आवाहन इतर मागास बहुजण कल्याणाचे सहाय्यक संचालक श्री. बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला