August 8, 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात केले संविधान उद्येशिकेचे वाचन

  • मुंबई – संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.यावेळी क्रिडा मंत्री संजय बनसोडे,मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
    २६ नाव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. शासनाने विविध जिल्ह्यात संविधान मंदिरांची उभारणी केली असल्याचे सांगून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला.
    संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यासाठी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!