मोहा – गुरुवार दि.२६ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी गुरुजींच्या कार्याला व शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. प्राचार्य अविनाश मोरे यांनी आपल्या मनोगतातून मोहेकर गुरुजींनी ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविले,असे सांगितले.त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक परिश्रमामुळे शिक्षणसंस्था उभी राहिली व आजही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. गुरुजींचे जीवनकार्य हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमामुळे विद्यालयात कृतज्ञता,आदर आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षण महर्षींच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
More Stories
एनएमएमएसमध्ये ज्ञान प्रसार विद्यालयाचा झंझावात;३३ विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
वाढदिवसानिमित्त ज्ञानदानाचा उपक्रम;जनार्दन भामरे यांच्या कडून ‘भारताचे संविधान’ ग्रंथाची भेट
ज्ञान प्रसार विद्यालयात संत गाडगे बाबांना अभिवादन