स्पर्धा परीक्षेतील दैदिप्यमान यशातून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना कृतज्ञ अभिवादन
मोहा – शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा जपत ज्ञान प्रसार विद्यालय,मोहा यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या एनएमएमएस (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील तब्बल ३३ विद्यार्थी या स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या यशामध्ये सोनाक्षी केशव घुले, मधुरा महादेव मडके,आकांक्षा अक्रूर जाधव,विश्वरूप नवनाथ वाघमोडे,वैष्णवी बापूराव मडके, वैष्णवी विष्णू डिगे,वैष्णवी बळीराम राऊत,गौरी रामहरी जाधव,राजवीर महादेव सांगडे, नम्रता अनंत भांगे,सृष्टी बालाजी शिंदे,जानवी दिनेश लोकरे, सानिका प्रफुल्ल मडके,पायल अर्जुन कसबे,मयुरी अमोल मडके, श्रावणी बालाजी शिंदे,खुशी बालाजी मडके,श्वेता हनुमंत जाधव,सिद्धी राजाभाऊ मडके, श्रेया भाऊसाहेब शिंदे,सिद्धी राजाभाऊ वाघमारे,सिद्धी नारायण जाधव,विद्या अनिल घोडके,रितेश सचिन मांजरे, अक्षरा शिवाजी कोकाटे,स्नेहा बालाजी कानडे,अंजली राहुल मडके,सोहम गणेश घुले,प्रणव प्रकाश निकम,प्रणिता पद्माकर मडके,अथर्व बालाजी घोलप, सुजाता संतोष माळी व स्वराज गणेश जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक धनंजय मडके,शैलेश गुरव,ज्योतिराम सोनके,सतीश मडके तसेच श्रीमती नीता सोनवणे यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे व पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य मोरे यांनी विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगितले.कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
More Stories
ज्ञान प्रसार माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
वाढदिवसानिमित्त ज्ञानदानाचा उपक्रम;जनार्दन भामरे यांच्या कडून ‘भारताचे संविधान’ ग्रंथाची भेट
ज्ञान प्रसार विद्यालयात संत गाडगे बाबांना अभिवादन