वाशी- ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम संविधान अर्पण कलेल्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक बावकर सुनिल यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण भारताचे संविधान स्वीकारलेले असून त्यास आज रोजी ७५ वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधाना बाबत जागरुकता वाढावी यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली.वैयक्तिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी,शासनासाठी एक चौकट प्रस्थापित करण्यासाठी,कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी,स्थिरता प्रदान करण्यासाठी,नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी आणि अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला संविधानाची आवश्यकता आहे. असे मार्गदर्शन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक सुनिल बावकर यांनी केले.याप्रसंगी प्रशालेचे सांस्कृतीक विभाग प्रमुख सुहास जगताप यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे प्रास्तावीक व समारोप प्रशालेचे सहशिक्षक संतोष बोडके यांनी केला. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक संतोष ढोले,संतोष बोडके शिक्षकेत्तर पत्रकार शिवराम शिंदे,लहु फुरडे आदिंनी उपस्थीत राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
More Stories
संभाजी विद्यालयात लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
डॉ.अशोक मोहेकर वाढदिवस विशेषांकाचे पिंपळगाव (लिंगी) येथे प्रकाशन
संभाजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा