August 8, 2025

निष्क्रिय आमदाराच्या कर्तुत्वामुळे मतदारसंघाचा विकास थांबला – अजित पिंगळे

  • कळंब-धाराशिव मतदारसंघातील कोथळा,शिराढोण,पिंपरी (शि),बोरगाव(खुर्द),रायगव्हाण,जायफळ येथे शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांचा संवाद यात्रा उत्साहात

  • शिराढोण – शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पिंगळे यांनी आपल्या आवाहनातून मतदारसंघातील सध्याच्या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सध्याच्या आमदारावर निष्क्रियतेचा आरोप करत म्हटले की, त्यांच्या दुर्लक्षामुळे मतदारसंघातील मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत आणि विकासाच्या अनेक संधी हुकल्या आहेत.
    गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात विकासाचे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. रस्ते,पाणीपुरवठा, शिक्षण,आरोग्य सेवा आणि रोजगार निर्मिती यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष झाले आहे.सध्याच्या आमदारांची निष्क्रियता आणि विकासाविषयीची उदासीनता हे मतदारसंघाच्या मागे पडण्याचे प्रमुख कारण आहे.”
  • पुढे अजित पिंगळे म्हणाले की, “महायुतीच्या माध्यमातून लोकांच्या हितासाठी आम्ही सक्षम नेतृत्व आणि ठोस धोरणे आणू.या भागाला प्रगत आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.व या समस्या सोडवण्यासाठी मी पुढे येवून काम करेन व मतदारसंघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी कार्यरत असेल.
  • याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामहारी शिंदे,डॉ.सरोजनी राऊत सह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!