August 8, 2025

ज्ञानोद्योग माध्यमिक विद्यालयातील जुन्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

  • येरमाळा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक एस.एल.पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,येरमाळा येथे दि.३ नोव्हेंबर २०२४ रोजी इयत्ता दहावी १९९९-२००० ची बॅच मधील वर्ग मित्रांचा स्नेह मेळवा घेण्यात आला.
    या कार्यक्रमासाठी तत्कालीन गुरुजन वर्ग उपस्थित होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षकांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पौळ एस. एल.होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बारकुल यांनी केले. आभार पांगारकर यांनी मानले.
    सन १९९९-२००० च्या बॅचला शिकवणारे शिक्षक मुळे, बारकुल डी.आर, बारकुल भाऊसाहेब अप्पा, देशमुख, बारकुल पी एम., पाटील एस.एम,पाटील एस.पी., कुलकर्णी अशोक,कोठावळे,आनंद रामटेके,संभाजी गिड्डे ,श्रीमती बनसोडे, पेजगुडे,पौळ एस.एल. यांनी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!