येरमाळा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा येथील कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३१ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी ज्ञानोद्योग विद्यालयात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन साजरा करून नेतृत्व व अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमात मुख्याध्यापक जरीन तांबोळी,उपमुख्याध्यापक श्रुती अवधुत,पर्यवेक्षक शिवम बांगर, लिपिक धनश्री मुंढे,सेवक कार्तिक अनिल गायकवाड यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षक-शिक्षिकांची भूमिका निभावत वर्गात अध्यापन कार्य केले. यानंतर विद्यार्थी स्नेहसंमेलन घेण्यात आले.यावेळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी व सरस्वती यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल होते,तर प्रमुख पाहुणे डॉ.संदीप तांबारे उपस्थित होते. स्वयंशासन दिनातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास कोषाध्यक्ष अंकुश (बप्पा) पाटील,भाऊसाहेब (अप्पा) बारकुल,शालेय समिती अध्यक्ष पी.आय.आवारे,भोर (SBI) येरमाळा आदींची विशेष उपस्थिती होती. प्राचार्य सुनील पाटील यांनी प्रस्ताविक करत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पदाधिकारी जरीन तांबोळी,अमृता कोकाटे,स्नेहल मुंढे यांनी भाषणातून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे डॉ.संदीप तांबारे यांनी विनोदी शैलीत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना जिद्द,चिकाटी, मेहनत करून टेन्शन न घेता परीक्षेला सामोरे जाण्याचा यशमंत्र दिला. शिक्षक संदीप पेजगुडे यांनी आई-वडील व गुरुंचा सन्मान करण्याचा मोलाचा सल्ला दिला. तसेच श्रीमती सिना सिरसाट यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात प्रा. आबासाहेब बारकुल यांनी सर्व मान्यवरांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व आई-वडील,गुरु व शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी केले तर आभार वैष्णवी सावंत हिने मानले.अशा प्रकारे ज्ञानोद्योग विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात पार पडला.
More Stories
स्त्री शिक्षणाच्या जननींना अभिवादन;ज्ञानोद्योग विद्यालयात जयंतीनिमित्त सांस्कृतिक उपक्रम संपन्न
येरमाळ्यात लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी
ज्ञानोद्योग विद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण आदरांजली