June 20, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.01 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 125 कारवाया करुन 85,000 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-सविता शंकर शिंदे, वय 45 वर्षे, रा. रुई शिवार ता. वाशी जि. धाराशिव या दि.31.10.2024 रोजी 18.30 वा. सु.रुई शिवारात हातोला जाणारे रोडवर अंदाजे 11,600 ₹ किंमतीची 20 गावठी दारु व गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव 150 लिटर अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-दशरथ विलास वाघमोडे, वय 30 वर्षे, रा. इटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.31.10.2024 रोजी 18.00 वा. सु. ईटकळ येथे अंदाजे 2,400 ₹ किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “खुन.”
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-बबलु रंगा शिंदे, रा. सिडफार्म गोवर्धनवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.28.10.2024 रोजी 16.00 वा. सु. कावळेवाडी येथे व मयत नामे-विष्णु विठ्ठल शिंदे, वय 50 वर्षे, रा. कावळेवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मयताची मुली सोबत लग्न करण्यास नकार दिल्याचे कारणावरुन नमुद आरोपीने मयतास विषारी औषध जबरदस्तीने पाजून जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लक्ष्मी विष्णु शिंदे, वय 42 वर्षे, रा. कावळेवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.01.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 103(1), 77 सह बा.लै.अ.प्र.का. कलम 8,12 अन्वये गुन्हा नोंदवला.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-हनुमंत तुकाराम गाढवे, वय 61 वर्षे, रा. केळेवाडी, वाशी फाट्याजवळ ता. वाशी जि. धाराशिव यांचे राहते घराचा दरवाजा अनोळखी तीन इसमांनी दि. 30.10.2024 रोजी 12.30 ते 15.00 वा. सु. उघडून आतमध्ये प्रवेश करुन घरातील बेडरुममधील लोखंडी कपाटातील 29.3 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 26 भार चांदीचे दागिने असा एकुण7,47,050₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हनुमंत गाढवे यांनी दि.01.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(3),305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-शुभम कालिदास झोंबाडे, वय 26 वर्षे, रा. घाटशिळ रोड तुळजापूर हे दि. 31.10.2024 रोजी 00.30 ते 06.00 वा. सु. राजेशाही थाट हॉटेल मारुती साप्ताळ नगर च्या समोर नळदुर्ग रोड तुळजापूर हे बंद करुन घरी गेले असता अज्ञात व्यक्तीने हॉटेलचा दरवाजा तोडून हॉटेल मधील फॉक्सी कंपनीचा टिव्ही, किरणा माल, सीसीटिव्ही कॅमेरॅचा डिव्हीआर, व्होल्टस कंपनीचा डीस्प्ले, हॉटेल मधील भांडे, कोंल्ड्रींक्सचे 20 बॉक्स, पाणी बॉक्स,लॅपटज्ञॅप, रोख रक्कम 1,20,000₹ व 2 तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या असा एकुण 5,18,370₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शुभम झोंबाडे यांनी दि.01.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 334(1),305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-समाधान शिवाजी चौगुले, वय 35 वर्षे, रा.पिंपळा बु.,ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 4643 चेसी नं-MBLHA10EZBHM52877 व इजिंन नं-HA10EFBHM78968 ही दि. 28.10.2024 रोजी 23.30 ते दि. 29.10.2024 रोजी 02.00 वा. सु. देवकुराळी रोड पिंपळा बुद्रुक येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-समाधान चौगुले यांनी दि.01.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “फसवणुक.”
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-राजेश उर्फ नवनाथ चव्हाण, वय 36 वर्षे, रा. रामवाडी सोलापूर, राजेश भालचंद्र काळे, वय 36 वर्षे, गंगाराम गोविंद चव्हाण, वय 55 वर्षे, दोघे रा. सेटलमेंट कॉलनी सोलापूर, शकुंतला पुरुषोत्तम कसबे, वय 60 वर्षे, रा. रेल्वे लाईन संगमेश्वर कॉलेज जवळ चर्च चे पाठीमागे सेालापूर यांनी दि. 30.10.2024 रोजी 18.10 वा. सु. बॅक ऑफ महाराष्ट्र शाख ईट येथे मयत इसमाचे नावाची बनवट कागदपत्रे तयार करुन तोतयागिरी करुन त्यांचे नावावरील 37,000₹ रक्कम काढून शासनाची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-किरण बाळासाहेब शेवाळे, वय 36 वर्षे, नेमणुक वाशी पोलीस ठाणे यांनी दि.01.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318,(4), 336(2), 336(3), 340(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ लैंगीक अत्याचार.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :एका गावातील एक 22 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)सहा महिन्या पुर्वी व दि. 16.07.2024 रोजी 14.00 वा. पावेतो हीस सर्दी खोकला झाल्याने उपचार कामी हॉस्पीटल मध्ये गेली असता गावातील एका तरुणाने तिस इंजेक्शन देवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास व्हिडीओ दाखवून बदनामी करण्याची व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन पिडीत यांनी दि. 01.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64(2),351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • बेंबळी पोलीस ठाणे: मयत नामे-विशाल सुरेश काळे, वय 24 वर्षे, रा. रामनगर बेंबळी, महंमद गफार शेख, वय 29 वर्षे, रा. खॉजानगर बेंबळी ता. जि. धाराशिव हे दोघे दि. 16.10.2024 रोजी 21.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 13 सी.एच 9882 ही वरुन बेंबळी येथुन धाराशिव येथे जात होते. दरम्यान देवळाली शिवारातील नदीचे पुला जवळ चार वाहन क्र एमएच 13 सी.के. 1965 चा चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून विशाल काळे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात विशाल काळे व महंमद गफार शेख हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद वाहन चालक हा अपघात करुन अपघाताची माहिती न देता अपघात स्थळावरून वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरेश गोविंद काळे, वय 55 वर्षे, रा. रामनगर बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि.01.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(बी),106(2) सह 184, 187 मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे: मयत नामे-गणेश अर्जुन जुगदर रा. वाहिशिवणे, फिर्यादी नामे- अमोल बाळासाहेब केंगार, वय 31 वर्षे, रा. महीम ता. सांगोला जि. सोलापूर, आरोपी नामे- अजय सुनिल मोरे, रा. वाकिशिवणे ता. सांगोला जि. सोलापूर हे तिघे दि. 29.10.2024 रोजी 03.00 वा. सु.टेम्पो क्र एमएच 45 ए.एफ 7482 मधून सांगोला ते नागपूर जात होते. दरम्यान एनएच 361 हायवेवर ताकविकी शिवारात ट्रक क्र एमएच 45 ए.ई.2900 चालक आरोपी नामे- अरुण रामदास भंडारी रा. वेळापुर ता. माशिरस यांनी त्याचे ताब्यातील ट्रक हा इंडीकेटर रिुलेक्टर पार्कीुग न लावता हायगयी व निष्काळजीपणे रोडवर उभा करुन आरोपी नामे- अजय सुनिल मोरे यांनी त्यांचे ताब्यातील टेम्पो हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून रोडवर उभा असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडक दिली. या अपघातात गणेश जुगदर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अमोल केंगार हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमोल केंगार यांनी दि.01.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(बी),106(1) सह 134 (अ) (ब) मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-संजय गणपती बिराजदार, संदीप संजय बिराजदार, गोपाळ बबन जाधव सर्व रा. कोडजीगड ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 01.11.2024 रोजी 01.30 वा. सु. कोंडजीगड येथे फिर्यादी नामे-दत्ता गणपती बिराजदार वय 47 वर्षे, रा.कोंडजीगड ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत वाटणीच्या कारणावरुन घरात येवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दत्ता बिराजदार यांनी दि.01.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 333, 118(1), 115(2), 352, 351(2) (3) ,3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-प्रतिक भागवत पडवळ, प्रणिता भागवत पडवळ, भागवत भिमराव पडवळ तिघे रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांनी दि. 28.10.2024 रोजी 18.00 वा. सु.भोईटे सभागृहा समोर रुईभर येथे फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर शिवाजी निंबाळकर, वय 24 वर्षे, रा.रुईभर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मोटरसायकलचा धक्का लागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड,फर्शीचा तुकड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर निंबाळकर यांनी दि.01.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2) (3) ,3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-रविंद्र दौलतराव माने, सर्जेराव कुंडलीक माने, दोघे रा.शिंगोली ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 30.10.2024 रोजी 09.00 वा. सु.जिल्हा परिषद शाळेच्या कडेला शिंगोली येथे फिर्यादी नामे-राजकुमार रामचंद्र मते, वय 37 वर्षे, रा.शिंगोली ता.कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी माहिती अधिकार टाकण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळई व दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राजकुमार मते यांनी दि.01.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!