March 25, 2026

येरमाळ्यात लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी

  • येरमाळा – कळंब तालुक्यातील येरमाळा येथील दुधाळवाडी पाटी येथे शुक्रवारी दि.१२ डिसेंबर २०२५ रोजी लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा,कीर्तनसेवा, रक्तदान शिबीर तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात येरमाळा, रत्नापूर,दुधाळवाडी,बांगरवाडी व उपळाई येथील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
    जयंती कार्यक्रमाची सुरुवात ह.भ. प.श्रीराम चोले महाराज (बीड) यांच्या प्रेरणादायी कीर्तनसेवेने झाली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ६५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
    या कार्यक्रमाची संकल्पना व पुढाकार विकास जाधवर,गोविंद मुंडे,भिवाजी शिरसाठ,अजित तांबडे,राजाभाऊ बांगर,विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुभाष लाटे, बापूराव बांगर,विठ्ठल मुंडे,प्रवीण जाधवर,अविनाश जाधवर, बालाजी लाटे तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मित्रपरिवार यांनी घेतला.
    लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याला अभिवादन करत जयंती कार्यक्रम समाजप्रबोधन व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा ठरला.

error: Content is protected !!