September 13, 2026

विद्या मंदिर हायस्कूल आष्टा येथे गुरुजींना वंदन

  • आष्टा – शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान देणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुल येथे दि.३१ ऑक्टोबर २०२४ वार गुरुवार रोजी प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    गुरुजींचे अथक परिश्रम, ज्ञानदान आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात केलेल्या सकारात्मक बदलांसाठी आपण त्यांचे सदैव ऋणी राहूत व त्यांच्या शिक्षणाबद्दलची तळमळ आणि समाजातील शैक्षणिक विकासासाठी दिलेली प्रेरणा ही आगामी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
    याप्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,शिक्षकेतर कर्मचारी सुजितकुमार जाधव,बबन यादव यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!