June 24, 2025

उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव यांचा सेवा गौरव समारंभ उत्साहात संपन्न

  • लातूर – महात्मा बसेश्वर महाविद्यालय,लातूर येथील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील उपप्राचार्य प्रा. बालाजी माधव जाधव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.दि.३१ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचा सेवा गौरव सोहळा महाविद्यालयात संपन्न झाला.
    यावेळी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर,कार्यकारी संचालक प्रदीपकुमार दिंडेगावे,प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे,माजी उपप्राचार्य प्रा.बी.एस.पनूरे, माजी पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे,कार्यालयीन प्रमुख नामदेव बेंदरगे,डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.अश्विनी रोडे,विशाल दिंडेगावे, सत्कारमूर्ती उपप्राचार्य प्रा. बालाजी माधवराव जाधव, सुनीता जाधव,संतोष जाधव, सुरज जाधव, कु.शितल जाधव यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि महिला पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.
    यानंतर श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर आणि कार्यकारी संचालक प्रदीपकुमार दिंडेगावे यांनी उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव यांचा शाल, पुष्पहार,पत्र आणि आहेर देऊन सहपरिवार सत्कार केला.
    यावेळी कार्यकारी संचालक प्रदीप कुमार दिंडेगावे, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, डॉ. दुष्यंत कटारे,माजी उपप्राचार्य प्रा.बी.एस.पनूरे,संतोष जाधव आणि नामदेव बेंदर्गे यांनी मनोगतातून पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
    या सेवा गौरव सोहळ्यामध्ये सत्काराला उत्तर देताना उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव म्हणाले की,श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेतील सर्व सन्माननीय संस्था पदाधिकाऱ्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य प्राध्यापकावर एका विभागाचे जबाबदारी सोपविली आणि ती जबाबदारी मी माझ्या कर्तव्यनिष्ठ भावनेने तब्बल ३३ वर्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, आज माझ्या सेवा गौरव सोहळ्याला संस्थेचे सचिव आणि कार्यकारी संचालक, प्राचार्य, माजी प्राचार्य, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. याबद्दल माझ्या मनामध्ये आनंदाच्या भावना आहे असे सांगून यापुढेही या महाविद्यालयाला आवश्यकता असेल त्यावेळी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले.
    या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम हा व्यवसायाभिमुख असा अभ्यासक्रम आहे.या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ३३ वर्ष अध्यापणाचे कार्य उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केले आहे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची दोन मुले, कन्या उच्चविद्याविभूषित असून त्यांना पुढील आयुष्य निरोगी. सुदृढ आणि आरोग्यदायी जावो अशी सदिच्छा ही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.संजय पवार, सूत्रसंचालन प्रा.व्यंकट दुडिले यांनी केले तर आभार प्रा.दयानंद टेंकाळे यांनी मानले.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्रमंडळी,प्रा.किसनाथ कुडके, रत्नेश्वर स्वामी,विनायक लोमटे, महादेव स्वामी,अनिल उस्तुरगे, कृष्णा बडगिरे,योगेश मोदी, बालाजी होनराव,शिवशंकर खुब्बा,शंकर कांबळे रंगनाथ लांडगे आणि कृष्णा कोळी यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!