कळंब – शिक्षणाच्या क्षेत्रात आदर्शवत योगदान देणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना दि.३१ ऑक्टोबर २०२४ वार गुरुवार रोजी शहरातील शि. म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. समाजातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि दृढ संकल्पामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांनी समाजाला एक दिशादर्शक मार्ग दिला आहे. पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. त्यांचाच आदर्श घेवून पुढील काळात ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी शिक्षणात नव्या कल्पना आणि तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. शिक्षण क्षेत्रात महर्षी म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. त्यांचे कार्य हे शिक्षण प्रेमींना प्रेरणा देणारे आहे आणि त्यांच्या कार्यामुळे समाजात शिक्षणाची एक नवी दिशा मिळाली आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रबंधक हनुमंत जाधव यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अरुण मुंढे,अर्जुन वाघमारे,जयसिंग तांबवे यांची उपस्थिती होती.
More Stories
शहरात श्री क्षेत्र गजानन महाराज पालखीचे आगमन व जल्लोषात स्वागत
मोहेकर महाविद्यालयांमध्ये ऑलिंपिक डे साजरा
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा