April 24, 2026

भूम तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांची उपशिक्षणाधिकारीपदी पदोन्नती;विद्यामंदिर हायस्कूल आष्टाकडून गौरव व अभिनंदनाचा वर्षाव

  • भूम – तालुक्याचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष व मुरब्बी प्रशासक म्हणून ओळखले जाणारे गटशिक्षणाधिकारी राहुलजी भट्टी यांची पंचायत समिती वडवणी येथे उप शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    आपल्या स्नेहपूर्ण वागणुकीने, अमोघ वक्तृत्वाने आणि प्रभावी प्रशासकीय कौशल्याने त्यांनी भूम तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी तालुक्याला नेहमीच सर्वोत्तम स्थानी ठेवले.विशेषतः उपेक्षित व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शासकीय योजना व शैक्षणिक लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
    ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा यांच्या वतीने राहुल भट्टी यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

  • यावेळी पंचायत समिती,भूमचे शिक्षण विस्तार अधिकारी टकले, मुख्याध्यापक आनंद रामटेके, सहशिक्षक शशिकांत मांजरे व इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सर्वांनीच राहुल भट्टी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!