कळंब (अविनाश घोडके) – शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दैनिक लोकप्रबोधन चे संपादक चेतन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन सेनेचे धाराशिव जिल्हा प्रमुख अनिल हजारे यांच्या नियोजनात दि.२५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत आरक्षणाच्या उपवर्गीकरण (अ,ब,क,ड) विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.उपस्थित वक्त्यांनी आरक्षण हे सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन असून त्यामध्ये उपवर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना व्यक्त केली.या पार्श्वभूमीवर आरक्षण उपवर्गीकरणाचा ठाम विरोध करण्याचा निर्धार सर्वांनी एकमुखाने व्यक्त केला. यावेळी “आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मंच,कळंब” ची स्थापना करण्यात आली.या मंचाच्या माध्यमातून जनजागृती,संघटन बळकटीकरण आणि शासनापर्यंत ठोस भूमिका पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविताना दि.४ मे रोजी कळंब शहरात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व समाजबांधव,युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. बैठकीस तालुक्यातील विविध गावांतील आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
सिद्धांत नगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य डिजिटल कमान व CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पन उत्साहात